तहसील कार्यालयातील 37 जप्त वाहनांचा होणार लिलाव Ø अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतुक करतांना जप्त

0
168

तहसील कार्यालयातील 37 जप्त वाहनांचा होणार लिलाव

 

Ø अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतुक करतांना जप्त

 

चंद्रपूर, दि. 3 : अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या एकूण 37 वाहनांचा लिलाव तहसील कार्यालय चंद्रपूरतर्फे 10 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम भरण्यास वाजवी संधी देऊनही वाहन मालकांनी रकमेचा भरणा न केल्याने सदर लिलाव करण्यात येत

 

लिलाव करण्यात येणारी वाहने ही अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करणारी असून तहसील कार्यालयामार्फत केलेल्या कारवाईत सदर वाहने जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती. वाहन मालकांना त्यांच्यावर ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम भरण्यास पुरेसा वेळही देण्यात आला होता. मात्र अद्यापपावेतो त्यांनी दंडाचा भरणा न केल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या तरतुदींना अधीन राहून सदर लिलाव प्रक्रिया करण्यात येत आहे.

 

जप्त केलेल्या वाहनांची एकूण संख्या 37 असून यात 6 ट्रक, 20 ट्रॅक्टर, 2 तीन चाकी ऑटो, 8 हाफटन व 1 जेसीबी अशा वाहनांचा समावेश आहे. वाहन लिलावासंबंधी सविस्तर माहिती तहसील कार्यालय चंद्रपूरचे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व माहिती तलाठी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी वाहन लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन तहसिलदार चंद्रपूर यांच्यातर्फे करण्यात येत आहे

 

००००००.  आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here