जागतिक कर्णबधिरता सप्ताहानिमित्त विविध उपक्रम

0
20

जागतिक कर्णबधिरता सप्ताहानिमित्त विविध उपक्रम

 

चंद्रपूर, दि.21 : जागतिक कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

 

प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर सोनारकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. बंडू रामटेके यांनी कानाचे आजार व काळजी या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. सचिन बिलवाने यांनी कानाचे आजार व त्यावर उपचार याविषयी सविस्तर माहिती दिली.

 

या सप्ताहामध्ये कान-नाक- घसा तज्ज्ञ डॉ. सचिन बिलवने यांची कानाचे आजारासंदर्भात मुलाखत, वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकारी यांचा जागतिक कर्णबधीरता जनजागृती संदर्भात वेबिनार, जेष्ठ नागरीक यांचेकरीता कान तपासणी शिबिराचे आयोजन, एन.सी.डी., डी.ई.आय.सी., आणि आर.बी.एस.के. स्टॉफ यांची कार्यशाळा, दिव्यांग तपासणी शिबीर, शासकीय परिचर्या प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे रांगोळी स्पर्धा व कार्यशाळा यांचे आयोजन, जिल्हयातील शाळामध्ये विद्यार्थींची कानाची तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. बोरकर यांनी केले. संचालन अतुल शेंदरे यांनी तर आभार रविंद्र घाटोडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here