जिल्ह्यातील 23 व्यक्तिंचा सावकारी परवाना रद्द
चंद्रपूर, दि. 14 : सावकारी परवान्याचे नुतनीकरण न केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 23 व्यक्तिंचा सावकारी परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तिंना सावकारी व्यवसाय करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. यात चंद्रपूर तालुक्यातील 11 व्यक्ती, राजुरा तालुक्यातील 6, ब्रम्हपूरी तालुक्यातील 2 तसेच भद्रावती, नागभीड, सिंदेवाही आणि चिमूर तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तिचा समावेश आहे.
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अन्वये सावकारी परवाना नुतनीकरण 31 मार्च 2023 पूर्वी करणे बंधनकारक असते. त्यानंतर दोन महिन्यांच्या मुदतीत म्हणजे 31 मे 2023 पर्यंत अतिरिक्त शुल्क 500 रुपये भरून नुतनीकरण करता येते. मात्र त्यानंतर आलेल्या अर्जावर संबंधित सावकाराचे सहायक निबंधक, सहकारी संस्था हे अर्ज स्वीकारू शकत नाही. त्यामुळे सावकारी परवानाशिवाय संबंधित व्यक्तिंना सावकारी व्यवसाय करण्यास प्रतिबंध केला जातो. सध्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्यावतीने सावकारी परवाना रद्द करण्याची प्रकिया सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात असे एकूण 23 व्यक्ती असून त्यांचा परवाना रद्द करण्यात आल्याचे सावकाराचे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी कळविले आहे.
सावकारी परवाना रद्द झालेल्या व्यक्ती : चंद्रपूर तालुक्यातील विलास पांडूरंग निखारे (गजानन महाराज मंदीर रोड, स्नेहनगर, चंद्रपूर), विनोद नारायण अलगेरवार (हनुमान मंदिराजवळ भिवापूर रोड, चंद्रपूर), ओम हायर परचेस प्रोप्रा, शंकर वासुदेव शेंडे आणि कवलजितसिंग इंद्रजितसिंग सलूजा (चंद्रपूर), अशोक राजम येरकल (लालपेठ कॉलरी नं. 1, नांदगाव रोड, चंद्रपूर), बलविरसिंग हरभजनसिंग चड्डा (दीक्षित ले-आऊट, बापटनगर, चंद्रपूर), प्रकाश सिताराम गुंटेवार (सिव्हील लाईन, वॉर्ड क्र. 1, चंद्रपूर), सरीता राजेंद्र मालू (सिव्हील लाईन, चंद्रपूर), ईझी फायनान्स प्रोप्रा. शुभम मारोती खुसपरे (गजानन मंदीर वॉर्ड, चंद्रपूर), रामदेवबाबा फायनान्स प्रोप्रा. प्रशांत भास्करराव कोलप्याकवार (रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपूर) क्रिष्णा राज क्रिष्णन पी. क्रिष्णा स्वामी रेड्डी (तुकूम, चंद्रपूर) आणि निलेश मधूकर नावकर (बगड खिडकी, चंद्रपूर)
राजुरा तालुक्यातील अनिल रामभाऊ गंप्पावार (रामनगर कॉलनी, राजूरा), राजेश बंडू यशुरवार (गडी वॉर्ड क्र. 1, राजुरा), नवनीत चंद्रकांत घट्टवार (राणा वॉर्ड क्र. 5 राजुरा), अवेज शकील अन्सारी (मौलाना आझाद, राजुरा), संदीप घनश्याम पडवेकर (रमाबाई वॉर्ड, राजुरा) आणि अंकूश अरविंद्र गंप्पावार (इंदिरा नगर, राजुरा). ब्रम्हपूरी तालुक्यातील राजेंद्र श्यामसुंदर काळबांधे (मु.पो. हळदा, ता. ब्रम्हपुरी) आणि हनुमंतराव मोनाजी राऊत (हळदा, ता. ब्रम्हपुरी). याशिवाय मार्गवी आनंद नायर (न्यू समठाना, भद्रावती), हमीद युसूफ शेख (मु.पो. तळोधी, ता. नागभीड), मंदा बबनराव येमुलवार (मु.पो. सिंदेवाही) आणि जयलक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा सौरभ सुभाष येल्लेवार (मु.पो. भिसी, ता. चिमूर).
०००००००