स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांची पोलीस स्टेशन वरोरा हद्दीत प्रतिबंधित अवैध विक्री करीता आणलेल्या स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांची पोलीस स्टेशन वरोरा हद्दीत प्रतिबंधित अवैध विक्री करीता आणलेल्या सुगंधित तंबाखुतस्करांवर धडक कारवाईसुगंधित तंबाखुतस्करांवर धडक कारवाई
मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले त्याअनुशंगाने पो.नि. महेश कोंडावार स्थागुशा यांनी एक पथक नेमुन त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. आज दि. 14.03.2024 रोजी गोपनिय माहीतीगार यांनी खात्रीशीर माहीती दिली की, पो.स्टे. वरोरा परीसरात रात्रोगस्त करीत असता मुखबिरद्वारे खबर मिळाली की, नागपुर येथून गाडी क्र. एम.एच. 34 सि.डी. 8540 या पांढ-या रंगाच्या कार मध्ये महाराष्ट्र प्रतिबंधित केलेला सुगंधित तंम्बाकू चा साठा भरुन चंद्रपुर कडे अवैधरित्या विक्रीसाठी वाहतुक करीत आहे अश्या खात्रीशीर खबरेवरुन नंदोरी टोल नाका ता. वरोरा येथेनाकाबंदी केली असता सदर वाहनाची झडती घेतली असता कि. 5.77.600 रु.चा शासनाने प्रतिबंधित केलेला
सुंगधित तंबाकू २) कि. 15.50.000 कि. चेब्रोचे तुमचे टोयोटा कंपनिची गाडी व दोन मोबाईल.
असा एकुण 21,27,600/- रुपये चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला. सदर प्रतिबंधित सुगंधिन
हा शासनाने प्रतिबंधित केलेला असल्याने आरोपी यांनी अवैधरित्या विक्रीकरीता वाहतुक करोत असता मिळुन आल्यान आरोपी नामे 1) मुकेश नगिनभाई कातरानी, वय 46 वर्षेधंदा चालक व एक महीला दोन्ही रा. वार्ड क्र. 6 नेरी, दुर्गापुर ता.जि. चंद्रपुरयांचे विरुध्द पो.स्टे. वरोरा अप.क्र. /2024 कलम 328,188,272,273,34 भादवी सह कलम 30 (2), 26 (2) (अ), 3, 4, 59(1) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम नुसार गुन्हा नोंद केला असुन पुढील कायदेशीर कारवाई करणेकरीता जप्त मुद्देमाल व आरोपी नामे मुकेश नगिनभाई कातरानी, वय 46 वर्षेधंदा चालक व एक महोला
दोन्ही रा. वार्ड क्र. 6 नेरी, दुर्गापुर ता.जि. चंद्रपुरयांना पो.स्टे. वरोरा यांचे ताब्यात देण्यात आले. उपरोक्त कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा., अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रिना
जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे आदेशाने सपोनि मनोज गदादे सपोनि किशोर शेरको यांचे गोपनिय माहीतीवरुन सपोनि गदादे, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे चापोहवा दिनेश अराडे स्थागुशा चंद्रपुर सायबर पोलीस स्टेशन चे पोअं उमेश रोडे पो.स्टे. वरोरा येथील मपोशि किर्ती ठेंगणे यांनी सापळा रचुन यशस्वीरीत्या कारवाई केली.