*श्री राम कृष्ण हरी विवेकानंद वडगाव चंद्रपूर येथील संस्थेचा प्रदीर्घ सेवार्थ प्रवास*
*खरे वृत्तांत न्यूज पोर्टल यूट्यूब चैनल च्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम..*
श्री राम कृष्ण हरि विवेकानंद सेवार्थ या संस्थेची स्थापना 1991 पूर्वी झाली असून 1991 मध्ये रजिस्ट्रेशन झालेले आहे.
या संस्थेचे सदस्य साधारणता रामकृष्ण मठातुन दीक्षा घेतली आहे आणि सध्या सदस्यांची सदस्य संख्या 84 आहे. श्री राम कृष्ण स्वामी विवेकानंद मठाचे
भारतभर अकराशे युनिट असून आणि बेंगलोर मठ हेड ऑफिस कलकत्ता हावडा येथे आहे. त्याची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली होती. 1898 मध्ये संस्थेच्या माध्यमातून उपक्रम सामाजिक कार्य संस्कार केंद्र बालवाडी आहे तथा होमिओपॅथी दवाखाना आहेत. विशेष म्हणजे 11 विद्यार्थ्यांसाठी शिक्षा प्रदान करण्याकरिता सेवाभावी वस्तीगृह आहे. सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रथम ऍडमिशन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना वस्तीगृह उपलब्ध करून दिल्या जाते. विद्यार्थ्यांची संख्या साधारणता आठ विद्यार्थ्यांच्या वर असेल तर कोऑपरेटीव्ह मेस प्रशिक्षण देऊन नॉमिनल चार्ज वर उपलब्ध करून दिल्या जाते. सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना इथे प्रवेश दिला जातो हे विशेष बाब आहे . विद्यार्थी अभ्यास करिता स्पर्धा विषयक पुस्तके उपलब्ध करण्यात येऊन परीक्षेची तयारी केली जाते. सध्या स्थित मठाला सोलर पॅनल मिळाल्यामुळे मठाला साधारणता इलेक्ट्रिक बिल झिरो झाला असल्याची माहिती ट्रस्टच्या माध्यमातून मिळाली. स्वामी राघवेंद्र नाथ महाराज ,स्वामी ज्योती सुरभानंद महाराज साधारणता दोन महिन्यांमध्ये विजिट करीत असतात. या ट्रस्टच्या घटनेमध्ये 60% सामाजिक कार्य आहे पाच टक्के धार्मिक कार्यामध्ये कार्य करीत असतात .फंडाचा पैशातून खर्च करीत असतात प्रत्येक वर्षी सामाजिक कार्यक्रम यांचे युवा संमेलन करीत असतात. युवा अभ्यासगत जनजागरण संमेलन सात ते आठ वेळा करण्यात या सामाजिक कार्यात हातभार लावावा या दृष्टिकोनातूनध खरे वृत्तांत न्यूज नेटवर्क तर्फे न्यूज पोर्टलच्या चतुर्थ दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भोजनदान. ब्लॅंकेट वाटप. तथा लेटेस्ट 2024 स्पर्धा परीक्षा पुस्तक संचाचे वाटप रोख स्वरूपातआर्थिक मदत करण्यात आली. स्वामी राघवेंद्रनाथ महाराज तथा स्वामी ज्योती सुरभानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना स्वामी राघवेंद्र नाथ महाराज यांनी वृत्त संकलन करताना पत्रकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. तळागाळातील उपेक्षित, विरोधक आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे कार्य पत्रकारितेतून झाले पाहिजे. घटनांचे सूक्ष्म व व्यक्तिशः निरीक्षण, तसेच भरपूर वाचन केले पाहिजे, तरच समतोल पत्रकारिता करणे सहज शक्य होईल, असे प्रतिपादन खरे वृत्तांत पोर्टल तथा यूट्यूब चैनल च्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूर येथे केले.
यावेळी खरे वृत्तांत न्यूज पोर्टल अँड यूट्यूब चैनल चे संपादक
मोरेश्वर उधोजवार यांनी खरी वृत्तांत न्यूज नेटवर्क तर्फे राष्ट्रीय युवा दिवस व राष्ट्रीय सन गणतंत्र दिन वर्धापन दिन जागतिक पर्यावरण दिन या पर्वावर वर्षातून तीन वेळा सामाजिक बांधिलकी म्हणून उपक्रम करणार असल्याचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले
श्रीराम कृष्णहरी विवेकानंद सेवाश्रमात खरे वृत्तांत न्यूज पोर्टलच्या वर्धापन दिन साजरा १० मार्च २०२४ ला- चंद्रपूर वडगाव येथील स्थित
श्रीरामकृष्ण हरी विवेकानंद सेवाश्रम सभागृहात खरे वृत्तांत न्यूज पोर्टलचा वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी स्वामी राघवेंद्र नाथ महाराज नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. या वेळी खरे वृत्तांत न्यूज नेटवर्क तर्फे सामाजिक उपक्रम विषयावर संबोधन करण्यात आले . या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी ज्योती सूर्यभानंद महाराज , प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंकरराव झोडे तथा संचालक मंडळ व सदस्य तथा विद्यार्थीगनसह यावेळी खरे वृत्तांत न्यूज चैनल चे संपादक मोरेश्वर उधोजवार ,जिल्हा प्रतिनिधी चंदन देवांगन, छायाचित्र प्रतिनिधी मिलिंद वाकडे, बल्लारशा प्रतिनिधी काशिनाथ सिंह. वरोरा तालुका प्रतिनिधी नाना खेरकर, तथा चंद्रपूर गडचिरोली मीडिया संपादक प्रिया रामटेके, घुगुस तालुका प्रतिनिधी सहारे यांची उपस्थिती होती.