*ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना लोकसभेच्या तिकीट मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष….*
*इच्छा नसतानाही उमेदवारी न सोडला नाही पिच्छा….*
चंद्रपूर लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर पक्षाने बुधवार(ता. १३) माजी खासदारांचा पत्ता कट करून विकासपुरुष जो जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले याप्रमाणे उक्ति असलेले दिलेला शब्द पाळणारे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर चंद्रपूर सह बल्लारपूर मधील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून एकच जल्लोष केला.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून भारतीय जनता पार्टीतर्फे कुणाचा पत्ता कट होणार? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी महाराष्ट्रासह देशातील काही उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात चंद्रपूरलोक सभेसाठी विकास पुरुष सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर करताच आपल्या भूमिपुत्राला लोकसभा निवडणूूक लढविण्यासाठी देशातील एका मोठ्या पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल कार्यकर्त्यात समाधान व्यक्त होत आहे.
नव्हती इच्छा, पण उमेदवारीनं सोडला नाही पिच्छा; चंद्रपुरातून मुनगंटीवारच का? रणनीती काय? या सर्व गोष्टीचा उलगडा आता झालेला आहे
लोकसभा निवडणुकीचं माझं तिकीट कापलं जावं म्हणून मीच प्रयत्न करत असल्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. आता त्यांनाच भाजपनं चंद्रपुरातून उमेदवारी दिली आहे.
त्यामुळे भाजपा कार्यकर्त्याचा जल्लोष बल्लारशा सह चंद्रपूर मध्ये बघावयास मिळत आहे
नव्या संसदेच्या दरवाज्यासाठी लागणारी लाकडं आम्ही इथून पाठवली. पण आता त्याच दारातून मला आत जावं लागतंय की काय अशी भीती वाटते, असं म्हणत भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नसल्याचे संकेत दिले.
त्यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांना उद्देशून तुमचं वजन वापरा आणि माझी या भीतीतून मुक्तता करा, असं आवाहनही मुनगंटीवार यांनी केलं. या कार्यक्रमाला दिवस उलट नाही तोच भाजपनं मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे……..
मागील निवडणुकीत संपूर्ण राज्यात काँग्रेसचा सुपडासाफ झाला. २०१४ मध्ये राज्यात २ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसनं २०१९ मध्ये त्या दोन्ही जागा गमावल्या. पण चंद्रपूरमुळे काँग्रेसची पाटी कोरी राहिली नाही. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांनी कोणाच्या ध्यानीमनी नसताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे विद्यमान खासदार हंसराज अहीर यांना पराभवाचा धक्का दिला. अहीर यांचा ४४ हजार ७६३ मतांनी पराभव झाला.
मोदी लाट नसतानाही निवडून येणाऱ्या, विजयाची हॅट्ट्रिक केलेल्या, केंद्रात मंत्री असलेल्या हंसराज अहीर यांचा पराभव भाजपच्या वर्मी लागला. धानोरकर यांचं वर्षभरापूर्वी निधन झालं. त्यामुळे इथे त्यांच्या पत्नी प्रतिमा धानोरकर यांना काँग्रेसकडून तिकीट दिलं जाऊ शकतं. त्या चंद्रपुरातील वरोरा मतदारसंघाच्या आमदार आहेत. याशिवाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानीदेखील इथून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. त्यांच्यापुढे मुनगंटीवार तगडा चेहरा ठरू शकतात.
सुधीर मुनगंटीवार फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. आता शिंदे मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश आहे. मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांना उमेदवारी दिल्यास चंद्रपूरची जागा पुन्हा मिळवली जाऊ शकते, असा पक्षश्रेष्ठींचा होरा आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राज्य ‘काँग्रेसमुक्त’ होणार होतं. पण चंद्रपुरातील विजयामुळे भाजपचं स्वप्न भंगलं. त्यातच केंद्रीय मंत्री असलेल्या नेत्याचा पराभव झाल्यानं चंद्रपुरातला निकाल भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे यंदा तगडा उमेदवार देऊन चंद्रपूर पुन्हा मिळवायचं या हेतूनं भाजपच्या नेतृत्त्वानं मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे.
वर्षांपासून आपली जन्मभूमी आणि परिसराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, अशी त्यांची मनोमन इच्छा होति यातूनच आमदार निवडून आणल्यानंतर जिल्ह्यात अनेक इमारत बांधकामासाठी करोडो रुपयाचा निधी अनेक उद्याने अनेक प्रकल्प बांधकाम सुरू असून, जागतिक स्तरावर विविध महोत्सवाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर अलौकिक केले याचा सर्वांना आनंद होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे
विधानसभेच्या माध्यमातून थेट कॅबिनेट मंत्री असल्यामुळे यांनी शासनाचा निधी खेचून आणून विकास कामे केली आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात त्यांनी विविध निधीतून अनेक गावाचा चेहरा मोहरा बदललेला आहे त्यांना लोकसभेचा उमेदवारी जाहिर होताच बल्लारपूर सह चंद्रपूर येथे जल्लोष करण्यात आला. चौका चौकात भाजपाचे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. भाजपा जिला ग्रामीण अध्यक्ष हरीश शर्मा भाजपा शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह राजू दासरवार संजय मुपीडवार प्रमोद रमिलावर स्वामी रायबरण सतीश कनकम देवेंद्र वाटकर उपस्थित होते