*रेल्वे प्रवासी संघातर्फे बल्लारशाह एक्सप्रेसचे हर्षोल्लासात स्वागत*

0
126

*रेल्वे प्रवासी संघातर्फे बल्लारशाह एक्सप्रेसचे हर्षोल्लासात स्वागत*

 

 

*’ स्पेशल ‘ शब्द वगळल्याने प्रवाशांना दिलासा* रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार १२ मार्च २०२४ पासून ‘ स्पेशल ‘ शब्द वगळून नव्या गाडी क्रमांकावर लोकमान्य टिळक टर्मिनस – बल्लारशाह ( 22109 – बल्लारशाह सुपर फास्ट ) ही साप्ताहिक ट्रेन सुरु करण्यात आली आहे. वरोरा रेल्वे स्टेशनवर या गाडीचा थांबा देण्यात आला आहे. सदर गाडी वरोरा स्थानकात थांबताच, वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघ व अन्य सामाजिक संघटनांच्या वतीने नारळ फोडून, गुलाल उधळून व पेढे वाटून ‘ बल्लारशाह एक्सप्रेस ‘ चे जंगीे स्वागत करण्यात आले.

वरोऱ्यात ‘ बल्लारशाह सुपर फास्ट एक्सप्रेस ‘ थांबणार म्हणून १३ मार्चच्या सकाळपासूनच रेल्वे प्रवासी संघाच्या पदाधिकारी, सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनवर एकच गर्दी केली होती. वरोऱ्याला सकाळी १०.१९ वाजता येणारी ‘ 22109 डाऊन बल्लारशाह एक्सप्रेस ‘ पहिल्या दिवशी १०.२८ वाजता आली. वरोरा रेल्वे स्टेशनवर ‘ बल्लारशाह एक्सप्रेस ‘ चे आगमन होताच जल्लोषाने गुलाल उधळून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्टर चेतन मीना , ‘ बल्लारशाह एक्सप्रेस ‘ चे चालक कैलास काळपांडे व सहायकाचा पुष्पगुच्छ देऊन व हार टाकून सत्कार केला. गाडी चालक काळपांडे यांनी मागील काही वर्षांपूर्वीच्या घटनेला उजाळा दिला. ते म्हणाले की, “आनंदवन एक्सप्रेस जेव्हा प्रथमतः वरोरा रेल्वे स्टेशनवर आली होती त्यावेळी मीच चालक होतो आणि त्यावेळीसुद्धा प्रवासी संघातर्फे असेच स्वागत करण्यात आले होते “. यानिमित्ताने रेल्वे प्रवासी संघातर्फे रेल्वे मंत्री ना. अश्विनी वैष्णव यांनी ‘ स्पेशल ‘ शब्द वगळून प्रवाशांना दिलासा दिल्याबद्दल त्यांचे व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव, मध्य रेल्वेचे डीआरएम मनीष अग्रवाल यांचे आभार मानण्यात आले. यावेळी वरोरा- भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने, बळवंतराव शेलवटकर, खेमचंद नेरकर, प्रवीण सुराना, जगदीश तोटावार, मयूर दसुडे, मधुसूदन टिपले, संदीप गांधी, तुषार मर्दाने, कालूराम रामपूरे, अमित मांडवगडे वरोरा रेल्वे स्टेशन व्यापारी मंडळाचे पदाधिकारी रामदर्शन गुप्ता, प्रशांत केशवाणी, वरोरा चौकीचे आर.पी.एफ विपीन दातीर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरोरा आर.पी. एफ.चौकी इन्चार्ज आर. के. यादव, उपस्टेशन प्रबंधक सचिन गुप्ता, प्रवासी संघाचे सचिव जितेंद्र चोरडिया, प्रवीण गंधारे, राहुल देवडे, बबलू रॉय आदींचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here