*कोरोना काळात अंगणवाडी सेविका तथा आशा वर्कर यांचे कार्य कौतुकास्पद….*
*रंजनाताई पारशिवे यांचे मनोगत*
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबवण्यात येते.
आरोग्य हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था ग्रामस्थ आणि समाजातील अन्य घटकांमध्ये आरोग्या संदर्भात जनजागृती करणे, सुसंवाद घडवून समन्वय करणे, प्रोत्साहन देणे, वाटाघाटी निर्माण करणे यादृष्टीने ‘आशा स्वयंसेविका’ महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करतात.
आशा स्वयंसेवक ही गावातील स्थानिक असते. आशा स्वयंसेवकाकडून गावातील आरोग्य विषयक समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी नेतृत्व करणे हे योगदान अपेक्षित असतं.
आपले आरोग्य व जीवाची पर्वा न करता गावाची काळजी वाहणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व मदतनीस कशाचीही पर्वा न करता तुटपुंज्या मानधनात इमाने इतबारे आपले आपले कर्तव्य बजावत असतात. याच अंगणवाडी सेविकांच्या कार्याची दखल घेण्यात आली
सौ रंजना पारशिवे
म्हणाल्या, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात अनेकांनी धास्ती घेतली होती. कोरोनाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. शासनाच्या सर्व प्रशासकीय यंत्रणा अस्वस्थ होत्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करताना प्रभागात नागरिकांकडून त्रास, अपमान सहन करीत जबाबदारीची जाणीव ठेवून अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी काम केले. जागतिक महिलादिनी त्यांचा गौरव होणे गरजेचे आहे.
आज महिला जागतिक दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आदरणीय.सौ. रुपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून व सौ रंजना पारशिवे राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा यांच्या पुढाकाराने 8 मार्च महिला जागतिक दिनानिमित्त महाराष्ट्र आणि देशातल्या सार्वजनिक व्यवस्थेला टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वतःच्या आरोग्याची काळजी न बाळगता कोरोना सारख्या व जिल्ह्यातील महापूरा सारख्या संकटामध्ये आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष करून जनतेच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिल्याबद्दल आठ मार्च महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यामधील माजरी, पातळा, कुचना माणगाव, थोरांना या परिसरातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका महिलांना सन्मानपत्र व गुलाबाचे फुल देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी सौ.संगीताताई हनुमंते आशा काँसिलेटरस सौ.माया मडावी,सौ. प्रणिता उईके,सौ.पूजा मिलमिले, सौ.जोशना बावणे,सौ.गीता बोदाने,सौ.मनीषा पारशिवे, सौ.शारदा चट्टे,सौ.गीता नागपुरे,सौ.मंगला नक्षीने या सर्वांना सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षा सौ.रंजनाताई पारशिवे तसेच वरोरा,भद्रावती विधानसभा अध्यक्ष.श्री.विलास भाऊ नेरकर,वरोरा भद्रावती युवा विधानसभा अध्यक्ष श्री.
सुशांत लांडगे,श्रीमती.मंदाताई घागी,सौ.रत्नमालाताई बोरकर व इतर महिला उपस्थित होत्या
यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांचा सत्कार करण्यात