*अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी सरसावले निखिल सुरमवार यांचे हात*
चंद्रपूर :एखाद्या ठिकाणी अपघात झाला की, अपघातग्रस्तांची मदत न करता त्यांचे फोटो काढत असल्याने अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु अपघात झाल्याचे समजताच हातातील काम सोडून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा देवदूत म्हणून निखिल सुरंमवारअशी ओळख निर्माण झाली आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक
अपघातग्रस्तांना जीवनदान दिले असल्याने मदतीसाठी धावून येणारा देवदूत अशी त्यांची सर्वत्र ओळख आहे.
व्यहाड खुर्द(ता. सावली) या छोट्याशा गावातील निखिल सुरमवार हे युवा कार्यकर्ता असून अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या हातून होत असतात. आपण समाजाचे काही देणे लागतो, “सेवाभाव परमो धर्म’ या उक्तीनुसार अडीअडचणीत किंवा अपघातग्रस्तांना मदतीचा हात द्यावा या आजोबा आजी शिकवणीतून निखिल सुरमवार अपघातग्रस्तांची अनेक वर्षापासून मदत करीत आहेत. निमगाव . व्यहाड कॅम्प सावली यासह आजूबाजूच्या गावांमध्ये अपघात झाल्याचे कळताच निखिल सुरमवार स्वतः आपल्या त्याच्या कार्यकर्त्याच्या मार्फतीने आपल्या हातातील काम सोडून त्या अपघातग्रस्ताची मदत करण्यासाठी जातात.
याची प्रचिती पुन्हा काल दिनांक ४/३/२०२४ ला* रोजी संध्याकाळी ७ वाजता च्या दरम्यान चकपिरंजी – हिरापूर असलेल्या टोल नाक्यालगत गडचिरोली चंद्रपूर मार्गांवर गडचिरोली येथील दोन युवकांचा भिषण अपघात झाला त्यात ते गंभीर जखमी झाले, अपघात बघायला आलेल्या लोकांनि एकच गर्दी केली.पण कोणीच त्यांना दवाखान्यात भरती करण्यासाठी तयार नव्हते,घरी परत जात असताना लोकांची गर्दी बघून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिलभाऊ सुरमवार यांनी गाडी थांबवून त्या रुग्णांना १०८ क्रमाकावर फोन लावत ऍम्ब्युलन्स बोलून सावली येथील ग्रामीन रुग्ण्यालयात भरती केले.त्यांचे या सेवभावी कर्तृत्वाचे सर्व स्तरावरून स्वागत करण्यात येत आहे.
आतापर्यंत निखिल सुरमवार यांनी अपघातात जखमी झालेल्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल केल्यामुळे अनेक अपघातग्रस्तांना जीवदान मिळाल्याने त्यांच्यासाठी ते देवदूतच ठरले आहेत.
स्वखर्चाने रुग्णावर उपचार
सावली तालुक्यातील आजूबाजूच्या गावांमध्ये अपघात किंवा कोणतीही घटना घडल्याचे समजताच क्षणाचाही विलंब न करता निखिल सुरमवार हे त्यांच्या मदतीसाठी धावून त्याला उपचारासाठी स्वतः व कार्यकर्त्याच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करतात. अनेकदा काही रुग्णांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात देखील दाखल केले असून रुग्णांच्या नातेवाइकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यास त्यांनी गावकऱ्यांसह मित्रमंडळींच्या मदतीने रुग्णालयाचा खर्च देखील केलेला आहे.
रोज आपल्या आयुष्यातील काही तास रुग्ण सेवेसाठी
सावली तालुक्यात अनेक दुर्गम भाग आहे. त्याठिकाणी वैद्यकीय यंत्रणा अत्यंत तोकडी असल्याने या ठिकाणांवरील नागरिक मदतीसाठी फोन करीत असल्याने त्यांना मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. तसेच दिवसातील काहि तास निखिल सुरुवात हे रुग्णांच्या सेवेसाठी देत असतात. रुग्णांच्या सेवेचे व्रत घेतलेल्या निखिल सुरमवार यांना त्यांचि आजी सह त्यांच्या कुटुंबीयांकडून नेहमीच प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांकडून मिळतेय सहकार्य
अनेक नागरिकांना पोलिस ठाण्यासह कोर्ट कचेरीच्या चकरा मारव्या लागतील यामुळे अपघात ग्रस्तांची मदत करण्याचे टाळत असतात. परंतु निखिल सूरमवार यांनी अनेक अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र पोलिसांकडून त्यांना नेहमीच सहकार्य मिळत असल्याने नागरिकांनी देखील पोलिसांना न घाबरता अपघातग्रस्तांची मदत करण्याचे आवाहन केले.
*पूर्वी अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्या पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जायची. परंतु नागरिकांनी आपल्या मनातील ही भीती दूर करून अपघात ग्रस्ताचे फोटो काढत बसण्यापेक्षा त्याला तत्काळ रुग्णालयात पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यावेळी जाती धर्माचा विचार न करता माणुसकीचा धर्म पाळावा.
-निखील सूरमवार*