*वरोरा पोलीसांची आठवडाभरात रेती तस्करावर दुसरी कारवाई….*
तालुक्यातील पोथरा नदीतून २४ फेब्रुवारीला ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 एपी १८०७ त्याच्या सोबतच बिना नंबर रेती भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली व यासह दुसरा ट्रॅक्टर एम एच ३२ वाहन क्रमांक ०४२२ यासह रेतीने भरलेली ट्रॉली एम एच 40 ए.६४३४ यांच्यावर कारवाई करत आठ लक्ष सात हजार रुपयाचा चा माल जप्त करत ट्रॅक्टर ड्रायव्हर आकाश लक्ष्मण ऊईके वय 26 वर्ष गाव बारवा वरोरा कपिल लक्ष्मण ढेकणे वय 21 वर्ष गाव खांबाळा वरोरा व वसंता दिलीप बावणे वय 43 वर्ष गाव खंबाळा यां तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला याची शाई वा वाळते न वाळते तोच आज दि.०.२/०३/२०२४ रोजी पहाटे पाच वाजता दरम्यान, तालुका वरोरा, ग्राम येवती येथील वेणा नदिच्या, मारोती देवघाटवर काही इसम हायवा, ट्रॅक्टर व जे.सी.बी.च्या साहयाने अवैद्यरीत्या रेती उत्खनन करत आहे. अशा गुप्त खबरेवरुन मा.नयोमी साटम मॅडम, सहायक पोलीस अधिक्षक, वरोरा यांनी मा.मुकम्मा सुदर्शन सा, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, मा.रिना जनबंधु मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली ग्रे. पोउपनि विलास बल्की, पोहवा धनराज गेडाम, पोलीस अंमलदार विठठ्ल काकडे,प भाउराव हेपट, रमेश कार्लेवाड, महेश गावतुरे, यांचेसह ग्राम येवती येथील वेणा नदिच्या, मारोती देवघाटवर जाउन कारवाई केली असता, १) विशाल मारोती बदकल, रा. मांढेळी, २) गजानन विठठ्ल येडमे, रा.वंदली ३) भोला आत्राम, रा.बोरी ४) लंकेश चंपतराव बदकल, रा.येवती ५) ओमप्रकाश साहु ६) विकासकुमार, ७) गज्जु मांगरूडकर रा. नागरी हे येवती येथील वेणा नदिच्या, मारोतीदेव घाटतुन, अवैद्यरीत्या रेती उत्खनन करून, जे.सी.बी.च्या साहयाने, दोन हायवा व एक ट्रॅक्टर मध्ये, भरत असतांना मिळुन आले. वरून घटनास्थळावरून ०२ हायवा, १ ट्रॅक्टर, जे.सी.बी.,०५ मोबाईल, व ८, ब्रास रेती असा एकुण १,०६,१५,०००रू.चा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरूध्द कलम-३७९,३४ भादवि, सहकलम-४८ महाराष्ट्र महसुल अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे पोस्टे वरोरा हे करत आहेत.