_अर्थसंकल्प प्रतिक्रिया*_  *सर्वच घटकांना न्याय देऊन गरिबांच्या कल्याणाचा विचार: ना. सुधीर मुनगंटीवार*

0
44

*_अर्थसंकल्प प्रतिक्रिया*_

 

*सर्वच घटकांना न्याय देऊन गरिबांच्या कल्याणाचा विचार: ना. सुधीर मुनगंटीवार*

 

*मुंबई, दि.२७-* महाराष्ट्रातील सर्वच घटकांना न्याय देत गरिबांच्या कल्याणाचा विचार करणारा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी सादर केला असून ‘गरीबोके सन्मान में महाराष्ट्र सरकार पूर्ण शक्ती के साथ मैदान में’, अशी प्रतिक्रिया राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

 

देशगौरव पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी भारताला विश्वगुरू बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी सर्वांना समान न्याय देणारा अर्थसंकल्प सादर केला. समाजातील सर्व घटकांचा समतोल विकास या अर्थसंकल्पातून होणार आहे. शिक्षण, रोजगार, शेती, उद्योग, महिला, तरुण, विद्यार्थी अश्या सर्वच घटकांना सामावून घेणारा, न्याय देणारा असा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here