*वरोरा शहरात दिवसाढवळ्या खुलेआम सट्टापट्टी जुगार सुरू*

0
41

*वरोरा शहरात दिवसाढवळ्या खुलेआम सट्टापट्टी जुगार सुरू*

 

*जुगार सट्टा पट्टी चालकांना अभय कोणाचे…*

 

जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक लाभल्यापासून गुन्हेगारी नियंत्रणा सह कोळसा वाळू जुगार सट्टा रेती तस्करी भूमिगत झालेली आहे मात्र वरोरा शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आयपीएस कर्तव्यदक्ष महिला अधिकारी रुजू झाली असताना त्यांच्या डोळ्यात तेल घालून पोलीस प्रशासनाला चकवेगिरी देत जुगार सट्टा खुलेआम सुरू असल्याने जुगार सट्टा संचालकाला अभय कोणाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे

चंद्रपूर:नव्या पोलिस अधिकाऱ्यांनी सूत्रे हाती घेतली की मटका, जुगार अड्ड्यांचा बीमोड करू, अशा घोषणा केल्या जातात. दणक्‍यात कारवाई करून जणू काही सर्व आलबेल असल्याचे वातावरण तयार होते. पुन्हा नव्या अधिकाऱ्याचा अंदाज आला की ‘येरे माझ्या मागल्या’ची परिस्थिती निर्माण होते, अशी परंपरा अनेक वर्ष नागरिकांनी बघितले आहेत अशीच प्रचिती

वरोरा शहराच्या गांधी चौक, ढिवर मोहल्ला, रेल्वे स्थानक परिसर, व अन्य भागात गावच्या पोटाशी असलेल्या चौकामध्ये त टीनाचे शेड मारून व गल्लीत गेल्या अनेक वर्षपासून हा सट्टा अड्डा चालत असल्याचे बोलले जात आहे याकडे पोलीस प्रशासन मात्र लक्ष देत नसून या विपरीत त्यांना आशिर्वाद देण्याचे काम करीत असल्याचे ऐकावयास मिळत आहे त्यामुळे सदर जुगार अड्ड्याला अभय कुणाचे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे..

 

दरम्यान, सदर सट्टा अड्ड्यावर गेल्या काही दिवसापासून सट्टा खेळणाऱ्या मध्ये या सट्याच्या अड्ड्यावर पैशाच्या देवान घेवाणीतून तुरळक वाद होत असून याचे परिणाम तुंबळ हाणामारी होण्याची शक्यता न करता येत नसल्याचे ऐकिवात आहे त्यामुळे भविष्यात शहरातील कायदा व सुव्यवस्था भंग होण्याचे संकेत मिळत असल्याचे वरोरा वासियांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वरोरा शहराच्या बाहेरील व आतील भागात गावात जाण्याचा मार्ग आहे या ठिकाणी या गावात एक गांधी चौक असून त्या परिसरात खुल्या जागेत शेड घेऊन त्या ठिकाणी बिनबोभाटपणे सट्टा अड्डा चालवीत असल्याचे दिसून येते. गेल्या दहा वर्ष भरापासून हा सट्टा अड्डाअखंडपणे चालू असून याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष नाही असे नाही कारण यापूर्वी सुद्धा पोलीस रेकॉर्डला सट्टा चालक गुन्हेगार आहेत हे निदर्शनास येते

एरवी मात्र गांधी चौक ढीवर मोहल्ला रेल्वे स्थानक परिसर भागातील अनेक जुगार प्रेमी आपली शौक भागवीत असतात परंतु या शौकिनांसाठी या चौकालगत असलेल्या शेडमध्ये सर्व सोययुक्त असा जुगार अड्डा सुरू केल्याने जुगार प्रेमी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असून या भागातील रस्त्यावरून जाणाऱ्या महिला व शाळा करून लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण हे जुगारी गोंधळ करीत, नशा पाणी करून अरेरावीची भाषा आपापसात वापरत, धिंगाणा घालत सट्टा खेळत आहेत. त्यामुळे या भागातील महिलांना आपला जीव मुठीत घेऊन आपली नियमित कामे या रस्त्याने करताना हा मान खाली टाकून कानावर हात ठेवून आपली कामे करावे लागत असल्याचे ही लोक चर्चेतून पुढे आले आहे सट्टा अड्ड्यावर दररोज हमरी तुमरीही होत असून गेल्या कांही दिवसांपूर्वी याचा विपर्यास होऊन प्रकरण हातघाईवर आलेले ही लोक चर्चेतून नाही ऐकावयास मिळत आहे झगडे भांडण विपर्यास असे काही झाल्यास सट्टा अड्डा बंद करून परंतु अजून पुन्हा हा जुगार अड्डा पुनःश्च चालू करण्यात येत असल्याचे चित्र गावकऱ्यांना बघावयास मिळत असून यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही

जागा मालक किंवा दुकान मालकाला आपले भाडे रोजच्या रोज मिळत असल्याने घर मालक ही या जुगार अड्याकडे कानाडोळा करीत असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले आहे. शिवाय हा जुगारसट्टा अड्डा अत्यंत रस्त्यालगतच चौकातअसल्याने शहरातील व बाहेरगावी राहत असलेले जुगार प्रेमी, शौकिनांना येथे येण्यासाठी सोयीचे झाले असल्याचेही या भागातील लोकांचे म्हणणे आहे.

 

वरोरा गावाच्या मध्य चौकात असलेल्या या जुगाराच्या अड्ड्यावर पोलीस प्रशासनाची खास मेहरबानी असल्याचे सांगण्यात आले’ कारण या ग्रामीण भागात नेहमी पोलिसांची गस्त राहत होती परंतु जुगार अड्डा तयार केल्यापासून या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे एकही शिपाई अधे मध्ये फिरकत असतो याचाच अर्थ पोलिसांच्याच मेहरबानीने हा जुगार अड्डा चालत असल्याचे अनेकांच्या मुखातून बोलले जात आहे. शिवाय येथे नेहमीच भांडण तंटे होत असल्याने उद्या गावातील वातावरण व कायदा सुव्यवस्था भंग पावण्याची शक्यताही या भागातील नागरिकांनी वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here