*25 फेब्रुवारीला गडचांदूर येथे सर्व लोहार समाज वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन..*

0
87

*25 फेब्रुवारीला गडचांदूर येथे सर्व लोहार समाज वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन..*

 

जगण्याचे साधन बनलेला लोहारकीचा व्यवसाय (Lohar Business) आधुनिक युगात अडचणीत सापडला आहे. शासनाकडून समाजाची अवहेलना होत असल्याने प्रगत पिढी या व्यवसायाकडे कानाडोळा करीत आहे. परिणामी हा व्यवसाय व कला सांभाळणारी पिढी दिवसेंदिवस कमी-कमी होत असल्याचे विदारक चित्र सध्या ग्रामीण भागात बघायला मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे (Modern Technology) विविध उत्पादित अवजारांमुळे या पारंपरिक व्यवसायाला खीळ बसली असून हा व्यवसाय संकटात सापडला आहे.

अशा वेळेस विवाहाचा मुलगा व मुलगी यांचे लग्न जुळवताना त्यांना बघण्याकरिता गावी गावि जावून होणारी व आर्थिक बचत व्हावी या उद्देशाने गडचांदुर येथील लोहार समाज संघटन ने एकत्रित

होऊन गडचांदूर येथे तालुकास्तरीय लोहार समाज वधू-वर परिचय मेळावा आयोजन केला आहेव विवाहयोग्य मुला मुलींना एकत्र आणून मुला मुलींचे विवाह बंधन रेशमगाठी जुळवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे लोहार समाज संघटना शाखा गडचांदूर चा उपक्रम हा स्तुत्य आहे

 

लोहार समाज संघटना शाखा गडचांदूर, यांच्यातर्फे दि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते ६ या दरम्यान गडचांदूर

येथील विश्वकर्मा नगर नायरा पेट्रोल पंप जवळ येथे लोहार समाज तालुका स्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भात तील

सर्व गाडीलोहार, खाती लोहार, खातवाडी लोहार आदींसह लोहार समाजातील तालुका स्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे

आयोजन करण्यात आले आहे. समाज बांधवांनी आपल्या विवाहेच्छुक मुलामुलींना घेऊन कार्यक्रमात सहभाग

घ्यावा. येताना मुला-मुलींचे दोन फोटो सोबत आणावेत. या वेळी या मुला-मुलींची नाव नोंदणी करण्यात येणार असल्याचे लोहार समाज संघटनचे अध्यक्ष कैलास हजारे, उपाध्यक्ष कवडू पेटकर, शंकर आपुरकार, संजय खडाळकर, संजय मडावी, संतोष सोनटक्के, विनोद वाघाडे, लक्ष्मण केळझरकर, मच्छिंद्र सोनटक्के, अविनाश पेटकर,चंदु निदेकर

यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here