*शिवरायांचे विचार आत्मसात करून ते आचरणात आणणे गरजेचे : निखिलभाऊ सुरमवार*

0
184

*शिवरायांचे विचार आत्मसात करून ते आचरणात आणणे गरजेचे : निखिलभाऊ सुरमवार*

 

*मौजा जाबं रयतवारी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले मनोगत….*

 

 

स्वराज्य रक्षक मंडळ तर्फे अंधश्रद्धा निर्मूलन सह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 

शिवराय सांगायला सोपे आहेत, शिवराय ऐकायला सोपे आहेत, शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे..

 

आणि जो शिवरायांना स्वतःच्या

 

आचरणात आणेल तोच खरा शिवभक्त असेल. त्यामुळे शिवजयंती साजरी करताना

 

शिवरायांचे विचार आत्मसात करा, असे आवाहन काँग्रेस युवा नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे संचालक निखिल भाऊ सुरमवार यांनी मौजा जांब रयतवारी येथे

उद्घाटकीय अध्यक्ष म्हणून व्यक्त केले.

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य रक्षक मंडळ जांब रयतवारी येथे अंधश्रद्धा निर्मूलन तथा सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटन ‘ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

 

छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण बोधलकर सौ प्रियांका हुलके तसेच यांचे सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

 

 

हजारो तलवारीचे युद्ध एका वाघनखाने जिंकता येते. मात्र, ते वापरण्यासाठी अफाट बुद्धिमत्ता लागते. हे शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करून सिद्ध केले. शिवाजी महाराजांकडे प्रचंड आत्मविश्वास होता. मॅरेथॉनच्या पठारावरील विजयाची बातमी देण्यासाठी ग्रीक सैनिक ४२ किमी. अंतर धावला आणि त्याने आपल्या राजाला आनंदाची बातमी देऊन आपले प्राण सोडले. तेव्हापासून सुरू झालेल्य मॅरेथॉनचे उदात्तीकरण केले जाते. मात्र, शिवाजी महाराज व त्यांचे मावळे सिद्धी जोहरच्या हल्ल्याला परतवून लावण्यासाठी अमावास्येच्या रात्री पावसामध्ये शत्रू पाठीवर घेऊन पन्हाळा गडापासून विशालगडापर्यंत न थांबता तब्बल ५२ किलोमीटर धावले, हा इतिहास खूप कमी लोकांना माहित आहे, हे आपले दुर्भाग्य आहे. म्हणूनच शिवाजी महाराजांचा इतिहास नवीन पिढीसमोर आला पाहिजे. शिवाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहोचले पाहिजेत आणि प्रत्येकाने महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजेत, तीच खरी शिवजयंती ठरेल, असे मत निखिल भाऊ सुरमवार यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रास्ताविक सादर करताना कांबळे सर मुख्याध्यापक जांब रयतवारी म्हणाले, छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास आजच्या पिढीला कळावा तसेच आजच्या विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून मिळणारे ज्ञान पूर्णतः खरे नसते त्याऐवजी प्रत्यक्ष अनुभवानिष्ठ ज्ञान मिळावे यासाठी हे शिवाजी महाराजांचे विचार व पसरत चाललेली अंधश्रद्धा यावरील मार्गदर्शक आले आहे त्याचा लाभ जाम रयतवारी परिसरातील व शिवप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन कांबळे सर यांनी केले.

 

यावेळी श्रीकृष्ण बोधलकर सौ प्रियांका हुलके यांनीही आपले विचार व्यक्त केले.

 

याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या न निखिल सुरमवार या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ वासेकर व आभार प्रदर्शन भागवत भूरसे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here