*प्राचार्य श्रीमती प्रतिमा नायडू यांना भारत भूषण पुरस्कार 2024*

0
52

*प्राचार्य श्रीमती प्रतिमा नायडू यांना भारत भूषण पुरस्कार 2024*

 

काल रविवार, दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी चंद्रपूर च्या वरोरा नाका येथील श्रमिक पत्रकार भवनाच्या सभागृहात “इग्नाईटिंग ड्रीम्स ऑफ यंग माइंड” अर्थात IDYM फाउंडेशनच्या वतीने विविध शाळांमध्ये शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्राचार्य म्हणून कार्यरत शिक्षकांना 2024 चा भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी चांदा शिक्षण मंडळ संचलित सिटी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिमा राजेश नायडू यांनाही त्यांनी केलेल्या विविध शालेय विकास आणि सामाजिक कार्याबद्दल भारतभूषण सन्मान 2024 ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार गोंडवाना विदयापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ.विजय आईंचवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे या अगोदरही मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिमा नायडू यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल चंद्रपूरच्या इनरव्हील क्लबतर्फे नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संचालन राजीव गांधी अभियंता महाविद्यालयाचे पुरस्कार विजेते शिक्षिका डॉ.अंजूम कुरेशी, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रविशंकर सर होते. कार्यक्रमास चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here