गर्भपातास मान्यता देण्याकरीता वैद्यकीय मंडळाची स्थापना
चंद्रपूर, दि. 17: वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 सुधारीत 2021 नुसार जिल्ह्यामध्ये वैद्यकीय मंडळ गठीत करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार 24 आठवड्या पलीकडील वैद्यकीय गर्भपातास मान्यता देण्याकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
वैद्यकीय मंडळात अध्यक्ष म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तसेच क्ष किरण तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, बालरोग, हृदयरोग, श्वसनविकार, अनुवंश, मानसोपचार आणि मेंदू विकार तज्ञ अशा नऊ तज्ञांचा गठित समितीत समावेश आहे. गर्भातील बाळाला काही प्रकारचे व्यंग असल्यास गर्भवती महिलांना 24 आठवड्या पलीकडील वैद्यकीय गर्भपातास मान्यता देण्याकरीता गठित वैद्यकीय मंडळास पाचारण करावे. हे समाजाला पटवून देण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी कळविले आहे.
00000