*दीपावली व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वयंघोषित संपादक पत्रकारांचा सुळसुळाट*
मराठी पत्रकारितेला स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठा इतिहास आहे. समाजाला दिशा देण्याचे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे, सकारात्मक गोष्टींना लोकांसमोर आणण्याचे आणि अपप्रवृत्तींना ठेचण्याचे काम आजवर असंख्य पत्रकारांनी केलेले आहे. आज पत्रकारिता क्षेत्रात विविध माध्यमांचा प्रभाव आहे. मात्र या सर्व माध्यमांचा मूळ पाया असणारी वृत्तपत्रसृष्टी सर्वार्थाने आजही प्रभावी आहे. या आपल्या मराठी वृत्तपत्रसृष्टीची मुहूर्तमेढ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक दिग्गजांनी ही परंपरा उज्वल केली. अगोदरच पारतंत्र्यात असलेला देश आणि त्यात अनिष्ट धार्मिक रुढी, परंपरा, चालिरीतींचा जनमानसावर मोठा प्रभाव या प्रतिकूल परिस्थितीविरोधात समाजजागृतीचे काम वर्तमानपत्राच्या माध्यमातून करण्याचे काम बाळशास्त्रींनी केले. बाळशास्त्रींचा हा प्रयोग इतका प्रभावी ठरला की पुढे जावून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीश राजवटीविरोधात लढताना एका विशिष्ठ समाजोपयोगी ध्येयवादाने परिस्थिती विरोधात जाऊन समाजजागृतीचे काम वर्तमानपत्राच्या
माध्यमातून करण्याचे काम बाळशास्त्रींनी केले. बाळशास्त्रींचा हा प्रयोग इतका
प्रभावी ठरला की पुढे जावून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीश राजवटीविरोधात लढताना एका विशिष्ठ समाजोपयोगी ध्येयवादाने पत्रकारितेची फार मोठी
चळवळ सुरु झाली. किंबहुना ही चळवळ केवळ स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंतच मर्यादित राहिली नाही तर त्यानंतरही पत्रकारितेला
दिशा देण्याचे काम या माध्यमातून झाले
पत्रकारितेचा अभिमानास्पद असा हा जाज्वल्य इतिहास सर्वज्ञात आहे.
मात्र या जाज्वल्य इतिहासला कलंकित करणारे सध्या बोगसगिरी पत्रकारांनी थैमान घातले आहे. हे बोगस पत्रकार लोकांना फसवत आहे तर कोणी स्वतःला अधिकारी भासवून लोकांची फसवणूक करत असतो हे आपण दररोज कुठे न कुठे पाहत आहोत. मात्र आता पत्रकारितेतही असेच बोगसगिरीचे पीक आले असून ना बातमी लिहायची अक्कल, ना कुठे बातमीदारीचा काम केलेला अनुभव, ना वार्तांकन करण्याची माहिती, ना पत्रकारितेची डिग्री मात्र तरीही स्वतःला थेट संपादक असून सुद्धा दुसऱ्या न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी बनवून तर काही महाभाग लिंक नसलेले आंतरराज्य यूट्यूब चैनल चे दिवाळी विशेषअंक काढण्याचे दीपावलीचे परिपत्रक ही अर्धवट ज्ञानी पत्रकाराकडून वाटप होत यावरच न थांबता मग त्यांचा दिवाळी अंक दिसणार कुठे हा न उलमगणारा कोड असून याकडे गांभीर्याने बघण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे काही महाभाग लोकांमध्ये जात असून दिवाळी विशेषांक काढणार असल्याचे दीपावलीचे परिपत्रक बनवून वाटप करीत आहे त्यांच्याकडून अक्षरशः बातमीदारीची लक्तरे काढली जात आहेत. अश्याच या बोगस संपादक आणि त्यांच्या बोगस पत्रकारांचा आज भांडाफोड होने ही काळाची गरज बनली आहे.
या दीपावलीत विधानसभा निवडणूक जाहीर होणार असून पत्रकारांना राजकीय नेत्यांकडून मोठे पॅकेज असते असा विचार मनाशी बांधून राजकीय राजकीय नेत्यांकडे वारी सुद्धा सुरू केली आहे. ना पोर्टलची लिंक ना युट्युब ची लिंक यांच्या जवळ असून राजकीय नेत्यांसह अधिकारी व कर्मचारी वर्ग याची शहनिशा न करताच या भाऊ बसा असा त्यांचा मानपान करून त्यांना वाव देत आहे एक नामी शक्कल लढवून नेत्यांचा आम्ही तुमच्या प्रचार सुरु केला आहे प्रकार आता सर्रास पहायला मिळत आहे. ही बोगसगिरी आता हा प्रकार अधिकारी कर्मचारी तथा राजकीय नेत्याच्या व नागरिकांच्याही लक्षात येत असून कालपर्यंत राजकारणात या त्या नेत्यांमागे धावणारे, गुटखा विक्री करणारे गवंडी मिस्त्री,भंगार चोर ,डिझेल चोर व्यवसाय करणारे, मारामाऱ्या, दादागिरी, फालतुगिरी करणारे आज अचानक प्रेस आयकार्ड गळ्यात घालून मिरवू लागल्याने नागरिकांमध्ये पत्रकारिता आणि तीच्या खऱ्या आणि खोट्या पत्रकारांविषयी कमालीची चर्चा सुरु आहे. मात्र हे प्रेस आयकार्ड अधिकृत आहे की अनधिकृत याची माहिती ते नागरिकांपासून लपवत असल्याचे आता दिसत आहे.
असा आहे बोगसगिरीचा फंडा.. अगोदर हे महाभाग एखादे वेबपोर्टल अथवा युट्यूब चॅनेल काढतात. मग त्या पोर्टल, चॅनेलला मनाला वाटेल ते नाव देतात आणि न्यूज च्या नावाखाली बूम तयार करून स्वतःच स्यांघोषित संपादक होऊन गळ्यात प्रेस आयकार्ड लटकवतात व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांचे सेल्फी घेऊन फेसबुक पोस्ट, व्हाट्सअप स्टेटस ठेवून अवैद्य धंदे करणार आल्यावर आम्ही यांच्या जवळचे असल्याचे सांगून दबंग गिरी करीत आहे असा काहीसा प्रकार पहायला मिळतो. हे सोशल मिडियावर अचकट विचकट कमेंट करून शिव्या खाल्लेले महाभाग नंतर प्रेस च्या नावाने गावोगावी फिरून दिवाळीचे परिपत्रक वाटत आहे बोगस पत्रकारितेचा फंडा उदयास आला आहे. ना भारत सरकारकडून न्यूज देण्याची कोणती परवानगीचे लायसन, ना RNI चे बातम्या छापण्याचे रजिस्ट्रेशन मात्र तरीही या बोगस महाभागांकडून अनधिकृतरीत्या न्यूज नाव दिलेले फेक प्रेस आयकार्ड छापून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सध्या सुरु आहे. जश्या पावसाळ्यात छत्र्या उगवतात तश्या दिवाळी व निवडणुका आल्या की डजनभर स्वयंघोषित संपादक, स्वयंघोषित पत्रकार उगवल्याचे दिसतात. कारण अधिकृत पत्रकारिता करणे वाटते तितके सोपे नाही. अधिकृत पत्रकारिता करत असताना भारत सरकारच्या, एम आय बी, पी आय बी, पी आर बी , आर एन आय च्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे लागते. तुमची प्रत्येक बातमी ही छापील किंवा प्रसारित स्वरूपात वरील शाखांना द्यावी लागते. त्यावर अनेकवेळा विलंबाचा दंड, आचारसंहिता आणि विविध टर्म अँड कंडिशन मधून जावे लागते आणि हे करण्यासाठी संपूर्ण वेळ पत्रकारितेला देणे, वाहून घेणे गरजेचे असते. मात्र हेच स्वयंघोषित संपादक, बोगस पत्रकार यातील काहीच करताना दिसत नाहीत कारण त्यांना अधिकृत मान्यताच नसते आणि त्यामुळे ते सोशल मिडिया प्रमाणे हे सर्व करत असतात आणि त्यांना प्रेस चा दर्जा प्राप्त नसतो. दीपावली व निवडणूक काळात अचानक उगवणारे हेच महाभाग मधल्या काळात कुठे गायब असतात. त्यांच्याकडून आजूबाजूच्या घडामोडी का मांडल्या जात नाहीत आणि नागरिकांचे दररोजचे जे महत्वाचे प्रश्न असतात त्यावेळी हे बोगस महाभाग नेमक्या कोणत्या बिळात लपलेले असतात असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक अधिकृतरित्या काम करणाऱ्या पत्रकारांना विचारत आहेत.
फक्त एमएसएमई (MSME) ला आपला चॅनेल रजिस्टर केला म्हणून प्रेस आयकार्ड छापायची परवानगी मिळत नाही.. ही तर मोठी फसवणूक
ना जर्नालीजम झाले, ना मोठ्या वृत्तपत्राला काम केलेला अनुभव, ना अधिकृत मान्यता असलेले चॅनेल, ना RNI चे रजिस्ट्रेशन तरीही हे बोगस महाभाग न्यूज, प्रेस नाव वापरून ज्या बातम्या चालवतात तो फक्त सोशल मीडियाचा एक भाग आहे. ज्यांनी एमएसएमई MSME रजिस्ट्रेशन करून आपले चॅनेल, वेबपोर्टल काढले त्यांना प्रेस आयकार्ड काढण्याचा कोणताही अधिकार नाही ते अधिकृत नाही अशी माहिती मिडिया विभागात काम करत असलेल्या मोठ्या संस्थांकडून दिली जात आहे. त्यामुळे हे मनमानी नाव देऊन तयार करण्यात आलेले युट्यूब चॅनेल्स मेनस्ट्रीम मीडिया, वृत्तपत्र विभागाचा भाग नाहीत आणि त्यांना प्रेस आयकार्ड काढण्याचा, देण्याचा, वापरण्याचा कोणताही अधिकार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अश्या या बोगसगिरीवर वर्षांनुवर्षे चालणाऱ्या चॅनेल्सना प्रेस लिहिण्याचा, प्रेस आयकार्ड छापण्याचा, तो गळ्यात लटकविण्याचा कोणताच अधिकार नाही.
तक्रार करा बोगसगिरीला आळा बसेल.. मात्र अश्या महाभागांच्या विरोधात कुणी तक्रार दाखल करत नसल्याने त्यांचे मनोबल वाढत जाऊन ते या बोगसगिरीने नागरिकांना ब्लॅकमेल करणे, फसवणे, खंडणी उकळने असले प्रताप करत आहेत. अश्या महाभागांवर नागरिकांनी वेळीच पुढे येऊन तक्रारी दाखल केल्यास दीपावली व निवडणुकीत उगवून स्वतःचे ज्ञान पाजळणारे कुठल्या कुठे गायब होतील हे सांगता येत नाही.
फक्त टायटल घेतले मात्र रजिस्ट्रेशन केले नाही अशी वृत्तपत्रेही छापत आहेत बातम्या टायटल आले त्याचे रजिस्ट्रेशन मात्र केले नाही आणि ते ब्लॉकही झाले तरी त्या वृत्तपत्राच्या नावाने बातम्या सुरूच असल्याचा प्रकार पहायला मिळत आहे.
काही ठिकाणी तर असेही पहायला मिळत आहे की, RNI ला पेपर रजिस्टर करायला पाठवला त्यानंतर अनेक किचकट प्रोसेस मधून जाऊन टायटल आले. टायटल आल्यानंतर मात्र रजिस्ट्रेशन झाले नाही तरीही त्या वृत्तपत्राच्या बातम्यांचे कटिंग तयार करून त्या सोशल मिडीयावर फिरविल्या जातात मात्र जर त्या टायटलचे रजिस्ट्रेशनच झाले नाही, टायटल डिब्लॉक झाले तर मग वृत्तपत्रासारख्या कटिंग तयार करून ब्लॉक झालेल्या टायटलच्या नावाने चालवणे हाही गुन्हा आहे. त्यामुळे यापुढे जर कुणाचे वृत्तपत्र डीब्लॉक करण्यात आले असेल आणि तरीही ती व्यक्ती त्या नावाने वृत्तपत्र कटिंग तयार करून ती व्हायरल करत असेल तर त्या व्यक्तीची तक्रार RNI च्या वेबसाईटवर होणार असून या बाबीकडे जिल्हाधिकारी कार्यालया सह जिल्हा माहिती कार्यालय व पोलीस अधीक्षक साहेबांनी जातीने लक्ष देऊन जिल्ह्यातील बोगस पत्रकारितेवर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी पत्रकार वर्गातून होत आहे व त्याच प्रमाणे त्यामुळे बोगस तर दूरच जे अगोदर वृत्तपत्र क्षेत्रात होते मात्र त्यांची वृत्तपत्रे डिब्लॉक करण्यात आली तरीही ते वृत्तपत्र छापत असतील किंवा त्याच्या कटिंग तयार करून फिरवत असतील त्यांनाही आता तक्रार झाल्यानंतर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे